!DOCTYPE html>
राष्ट्र सर्वप्रथम हि भावना आपल्या प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे.काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या युध्दा ने संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर दुरगामी असा परिणाम केला आहे. जगातील जवळपास सर्वच देशांना कमी अधिक प्रमाणात का होईना इंधन टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागते आहे. क्युबा सारख्या देशात अनेक दिवसांपासून इंधन शिल्लक नाही. कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत, त्याचा परिणाम सर्वच वस्तुंच्या किंमतीत वाढ होणार हे साहजिकच आहे. अशा परिस्थितीत जगातील बहुतांश देशांनी अगोदरच इ़ंधन दरवाढ केली आहे. अशा बिकट परिस्थितीत सर्वात उशिरा इंधन दरवाढ करणारा भारत एकमेव देश ठरला आहे. बाहेरून आयात करत असलेल्या इंधन साठा व रोज देशात वापरला जाणारा इंधन साठा यात काही प्रमाणात तफावत असल्याने सद्य स्थितीत इंधन बचत किंवा काटकसरीने इंधन
वापर करणं हा एकमेव पर्याय आपल्या सर्वांच्या समोर आहे. त्यामध्ये पेट्रोल, डिझेल, एल पी जी गॅस, ही एन जी गॅस यांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्याचबरोबर उर्जेच्या नैसर्गिक साधनसंपत्ती व स्रोता़ंचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर करणं हा पर्याय आहे. ज्यामध्ये सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांचा समावेश होतो. सर्वांनी एकजुटीने आणि हुशारीने इंधन टंचाईच्या समस्येला सामोरे गेल्यास आपण लवकरच ह्या परिस्थितीतून बाहेर निघू असा विश्वास मी व्यक्त करते. त्यासाठी आपण काय करू शकतो, भविष्यात सामान्य परिस्थितीतही आपण काही नियोजन केले पाहिजे आणि शिस्तबद्ध पद्धतीने इंधनाचा वापर केला पाहिजे. याविषयीची अधिक माहिती ह्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्याचा मी प्रयत्न केला आहे. आपण सकारात्मक रितीने विचार करून अंमलबजावणी कराल अशी आशा व्यक्त करते.
अपारंपरिक आणि कधीही न संपणारा स्रोत: सूर्यप्रकाश हा पृथ्वीवर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे आणि तो कधीही संपणारा नाही.
वीजबिल झीरो (कमी) करणे: घरी सोलर पॅनल बसवल्यास विजेची गरज भागवता येते, ज्यामुळे वीजबिलात मोठी बचत होते.
शासकीय सबसिडी: भारत सरकार सौर ऊर्जा वापरण्यासाठी मोठ्या प्रमाणात सबसिडी (अनुदान) देते, ज्यामुळे या प्रणालीची किंमत कमी होते.
स्वतंत्र ऊर्जा स्रोत: सौर पॅनेलमुळे तुम्ही वीज वितरकांवर कमी अवलंबून राहता आणि स्वतःची वीज स्वतः निर्माण करू शकता.
रेड सिग्नलवर इंजिन बंद करा: जर ट्रॅफिक सिग्नल किंवा जाममध्ये ३० सेकंदांपेक्षा जास्त वेळ थांबावे लागणार असेल, तर गाडीचे इंजिन बंद करा.
एसीचा (AC) वापर मर्यादित करा: गाडीमध्ये एसी सतत चालू ठेवल्याने मायलेज कमी होते. शक्य असेल तेव्हा मोकळ्या हवेचा आनंद घ्या आणि
प्रवासाचा मार्ग निश्चित करा: बाहेर पडण्यापूर्वी गुगल मॅपच्या मदतीने कमी ट्रॅफिक असलेला मार्ग निवडा. वारंवार थांबण्यामुळे इंधन जास्त वाया जाते.
इंधन भरण्याची योग्य वेळ: दुपारच्या उन्हात पेट्रोलचे बाष्पीभवन (Evaporation) अधिक होते. त्यामुळे नेहमी सकाळी किंवा संध्याकाळी थंड वातावरणात इंधन भरणे फायदेशीर ठरते.p>
Decode: PM Modi के काफिले में 2 गाड़ियों क्यों? | Sudhir Chaudhary| Gold | Petrol-Diesel Price Today
PM Modi Appeal Impact : PM मोदी की अपील को कैसे फॉलो कर रहे मुख्यमंत्री ? | Fuel Saving | Gold Price
PM Modi On Work From Home: Petrol-Diesel और Gold को लेकर PM Modi ने कह दी बड़ी बात | PM Modi On Oil
Decode: क्या है Energy Crisis से निकलने का फॉर्मूला? | Sudhir Chaudhary | PM Modi | Gold |Oil Crisis.
LED बल्बचा वापर: जुने बल्ब किंवा CFL काढून टाकून LED बल्ब लावा, जे ७५-८०% कमी वीज वापरतात.
५-स्टार उपकरणे: फ्रिज, एसी, वॉशिंग मशिन घेताना 'स्टार रेटिंग' तपासा; जास्त स्टार म्हणजे कमी वीज खप.
एसी (AC) योग्य वापर: एसीचे तापमान वर ठेवा. यामुळे विजेची मोठी बचत होते.
प्रत्येक प्रकारच्या ऊर्जेची बचत करणे ही आपले कर्तव्य आहे, परकीय चलन वाचवणे ही सुद्धा देशभक्तीच आहे.
भारतासाठी रोज पाच दशलक्ष बॅरल इतके इंधन लागते.त्यासाठी मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मोजावे लागते.
देशभरात रोज ५० लक्ष इतक्या गॅस सिलेंडरची मागणी आहे. त्यासाठी इंधन बचत आवश्यक आहे.
झाकण लावून स्वयंपाक करा: भांडी झाकल्यामुळे वाफ आणि उष्णता आतच अडकून राहते, ज्यामुळे अन्न लक्षणीयरीत्या लवकर शिजते आणि उष्णता बाहेर जाण्यापासून रोखली जाते.
धान्ये आधी भिजवणे: डाळी, तांदूळ आणि कडधान्ये शिजवण्यापूर्वी भिजवल्याने त्यांना पाणी शोषून घेण्यास मदत होते, ज्यामुळे उकळण्याचा आणि पाणी आटण्याचा लागणारा वेळ कमी होतो.\
जेवण एकत्र शिजवा: एकाच वेळी अनेक पदार्थ तयार करा आणि शिजवा. प्रेशर कुकर वापरत असल्यास, भात, डाळ आणि भाज्या एकाच वेळी शिजवण्यासाठी एकावर एक ठेवता येणारे सेपरेटर वापरा.
कमी धावण्याचा खर्च (Running Cost): इलेक्ट्रिक गाड्या चालवण्यासाठी पेट्रोल किंवा डिझेलऐवजी विजेचा वापर होतो. विजेचा खर्च इंधनाच्या तुलनेत खूपच कमी असतो, ज्यामुळे दरमहा मोठ्या प्रमाणावर पैशांची बचत होते.
चालवण्यास सोपे: बहुतांश इलेक्ट्रिक वाहनांमध्ये गिअर्स नसतात (Automatic Transmission). त्यामुळे ती ट्रॅफिकमध्ये चालवणे अतिशय सोपे आणि सुटसुटीत असते.
उत्कृष्ट पिकअप (Instant Torque): इलेक्ट्रिक मोटरमुळे ही वाहने एक्सिलेटर दाबताच त्वरित गती पकडतात, ज्यामुळे प्रवासाचा अनुभव अधिक चांगला मिळतो.
घरीच चार्जिंगची सोय: तुम्हाला पेट्रोल पंपावर रांगेत उभे राहण्याची गरज नाही. तुम्ही रात्री घरीच किंवा ऑफिसमध्ये तुमचे वाहन सहज चार्ज करू शकता
स्वच्छ व धूररहित इंधन: बायोगॅस ज्वलनामुळे धूर किंवा विषारी वायू तयार होत नाहीत. स्वयंपाकासाठी याचा वापर केल्याने महिलांच्या आरोग्याचे रक्षण होते.
उत्कृष्ट सेंद्रिय खत (स्लरी): बायोगॅस निर्मितीनंतर उरलेला भाग उत्तम दर्जाचे खत म्हणून शेतात वापरता येतो, ज्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते आणि रासायनिक खतांचा खर्च वाचतो.
कचरा व्यवस्थापन: घरगुती ओला कचरा आणि जनावरांच्या विष्ठेची योग्य विल्हेवाट लागते, ज्यामुळे आजार पसरवणारे कीटक आणि दुर्गंधीपासून सुटका मिळते.
पर्यावरण संरक्षण: यामुळे हरितगृह वायूंचे (उदा. मिथेन) उत्सर्जन कमी होते, तसेच लाकडासाठी होणारी वृक्षतोड थांबते.
थायलंड ह्या देशात लिफ्टचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे . ऑफीसमध्ये जातांना हाफ शर्ट किंवा टी शर्ट परिधान करण्याची अपील केली आहे.
बांगलादेशात चार चाकी वाहनांना रोज २ लीटर तर चार चाकी वाहनांना रोज १० लीटर इंधनाची परवानगी आहे.
फिलिपीन्स मध्ये एसी चे तापमान २४ डिग्री सेल्सियस पेक्षा आधिक ठेवण्याचे आव्हान करण्यात आले आहे. जेवणाच्या वेळेत लाइट्स आणि संगणक बंद ठेवण्यास सांगितले आहे.
वियतनाम मध्ये कमी अंतरासाठी सायकलीचा वापर करण्यावर भर असून, दुचाकी किंवा चार चाकी च्या वापरावर कायदेशीर कारवाईची शक्यता वर्तवली आहे.
सुट्टी, सहलीसाठी अनावश्यक परदेशात जाणे टाळावे.
विदेशी वस्तू खरेदी ऐवजी स्वदेशी वस्तूंचा स्विकार करावा.
विदेशातून होणार्या आयातीवर अवलंबून राहणं कमी करावं.
परकीय चलन वाचवणं देखील देशभक्ती आहे.