सुजाण नागरिक

ऊर्जास्रोत! प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा घटक म्हणजे ऊर्जास्रोत.देशाचा विकास तसेच विविध क्षेत्रातील प्रगती थेट त्या देशातील उपलब्ध असलेल्या ऊर्जास्रोतांवर अवलंबून असते. अशा परिस्थितीत जगातील बहुतांश देशांना इंधन टंचाई किंवा ऊर्जा संकटाला तोंड द्यावे लागते आहे. इंधन बचतीची गरज का आहे? आज जरी आपल्याकडे पर्याप्त इंधन साठा असला तरी, येत्या काही दिवसांत जागतिक पातळीवर अस्थिरता आणि युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने आयात होणाऱ्या इंधन साठ्याच्या भरवशावर न राहता काटकसरीचे इंधन वापरणं गरजेचं आहे. अन्यथा, दैनंदिन

जीवनात लागणार्या वस्तुंची वाहतूक, आपात्कालीन परिस्थितीत लागणार्या सेवा आणि सुविधा, आरोग्य सेवा, अग्निशमन दल, सार्वजनिक स्वच्छता विभागाच्या सेवा, आरोग्य सेवेसाठी लागणार्या साधनसामग्री निर्मिती करणारे प्रकल्प आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित अत्यावश्यक सर्व सेवा यासह सर्वच पुरवठा साखळीवर गंभीर परिणाम होईल. भविष्यात कुठल्याही इंधन टंचाईच्या समस्येला टाळण्यासाठी आज काटकसरीची शिस्त लावणं आणि इंधन नियोजन करणं प्रत्येकाला गरजेचे आहे रोज देशात लागणारा तेल साठा हा ५ दशलक्ष बॅरेल इतका आहे.

परकीय चलन वाचवण्यासाठी...

gold_bar

देश हितासाठी एक वर्षांपर्यंत सोनं खरेदी करणे टाळा.

dollar_currency

सोन्याच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर परकीय चलन खर्च होते..

save_fuel

पेट्रोल डिझेल आणि गॅसचा वापर आवश्यकतेनुसार व मर्यादित स्वरूपात करावा.

vacation

सुट्टी, सहलीसाठी अनावश्यक परदेशात जाणे टाळावे.

swadeshi

विदेशी वस्तू खरेदी ऐवजी स्वदेशी वस्तूंचा स्विकार करावा.

import

विदेशातून होणार्या आयातीवर अवलंबून राहणं कमी करावं.

foreign_currency

परकीय चलन वाचवणं देखील देशभक्ती आहे.

money

युध्दाच्या प्रभावापासून देशाला वाचवायचे आहे.

food_oil

जेवणाच्या तेलाचा वापर कमीत कमी करावा.

fertilizer

शेतात रसायनयुक्त खतांचा वापर कमी करावा व सोलर पंपाच्या वापर करावा.