आंतरराष्ट्रीय घडामोडी

जागतिक स्तरावर झालेले परिणाम आणि उपाययोजना

पश्चिम आशियातील (आखाती देश) युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक इंधन पुरवठा विस्कळीत झाला आहे. परिणामी, १२२ हून अधिक देशांमध्ये इंधन बचतीचे युद्धकालीन नियम लागू करण्यात आले आहेत. जगभरात इंधनाचे दर गगनाला भिडले असून अनेक देशांमध्ये आर्थिक संकट आणि वीज कपातीची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे सध्या जागतिक स्तरावर तीव्र इंधन टंचाई आणि ऊर्जेचे मोठे संकट निर्माण झाले आहे. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीने (IEA) याला इतिहासातील सर्वात मोठे इंधन संकट म्हटले आहे.

अन्नधान्य संकट: होर्मुझच्या सामुद्रधुनीतून ३०% पेषा जास्त जागतिक युरियाची (खत) निर्यात होते. इंधन टंचाई आणि खतांचा पुरवठा रोखल्यामुळे जगभरात अन्नधान्य उत्पादनाचा खर्च वाढून अन्न असुरक्षिततेची भीती निर्माण झाली आहे. पर्यायी ऊर्जेकडे वाटचाल: आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीच्या (IEA) माहितीनुसार, या संकटाचा सामना करण्यासाठी अनेक देश गॅस-आधारित वीज निर्मितीकडून तात्पुरते कोळशाकडे वळत आहेत, तर दुसरीकडे सौर आणि पवन ऊर्जेसारख्या नवीकरणीय ऊर्जेचा (Renewable Energy) वेग वाढवत आहेत.

globe

थायलंड ह्या देशात लिफ्टचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे . ऑफीसमध्ये जातांना हाफ शर्ट किंवा टी शर्ट परिधान करण्याची अपील केली आहे.

globe_map

बांगलादेशात चार चाकी वाहनांना रोज २ लीटर तर चार चाकी वाहनांना रोज १० लीटर इंधनाची परवानगी आहे.

world

फिलिपीन्स मध्ये एसी चे तापमान २४ डिग्री सेल्सियस पेक्षा आधिक ठेवण्याचे आव्हान करण्यात आले आहे.जेवणाच्या वेळेत लाइट्स आणि संगणक बंद ठेवण्यास सांगितले आहे.

world_map

वियतनाम मध्ये कमी अंतरासाठी सायकलीचा वापर करण्यावर भर असून, दुचाकी किंवा चार चाकी च्या वापरावर कायदेशीर कारवाईची शक्यता वर्तवली आहे.

आशियाई देश

earth

व्हिएतनाम, लाओस आणि कंबोडिया: दक्षिण-पूर्व आशियामध्ये या देशांची स्थिती सर्वाधिक नाजूक आहे.इंधन आयातीच्या परावलंबित्वामुळे येथे पेट्रोलियम उत्पादनांचा तीव्र तुटवडा जाणवत आहे.

earth

म्यानमार: देशात इंधनाची तीव्र टंचाई असून, पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा आहेत. खाजगी वाहनांचा वापर पर्यायी दिवसांवर (ऑड-इव्हन) मर्यादित केला आहे.

earth

जपानने आपल्या सामरिक साठ्यातून ८० दशलक्ष बॅरल तेल बाजारात सोडले आहे.

earth

श्रीलंका या देशामध्ये आधीच असलेल्या आर्थिक संकटामुळे आणि जागतिक दरवाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किमती ४०% ते ५०% पेषा जास्त वाढल्या आहेत, ज्यामुळे तिथे इंधनाचे तीव्र रेशनिंग सुरू आहे.